किरण गुरव : ‘‘मला लिहिण्याविषयी प्रचंड जिव्हाळा आहे. प्रेम आहे. खेच आहे म्हटलं तरी चालेल. मग ते कथात्म साहित्य असू दे, ललित लेख असू दे!”
मी लिहिण्यात प्रचंड रमणारा माणूस आहे. चांगलं पुस्तक असेल तर वाचनासंदर्भातही हे होतं. अशा वेळी स्थलकालाचाही निरास होत असतो, हे नंतर लक्षात येतं. वाचनातून, लिहिण्यातून लौकिक जगात परतायला भाग पाडणारं व्यावहारिक कारण अनेकदा दुष्ट वाटत राहतं. भान हरपून लिहिलेलं जास्त वाचनीय असतं असंही माझं निरीक्षण आहे. वाचनीयता हा साहित्याचा चांगला निकष ठरतो. साहित्यात माणूस असतो. त्याची गोष्ट असते.......